CoronaVirus News: देशात कोरोनाची दुसरी लाट येणार?; नीती आयोगानं दिला धोक्याचा इशारा

By कुणाल गवाणकर | Published: October 19, 2020 09:06 AM2020-10-19T09:06:12+5:302020-10-19T09:06:46+5:30

CoronaVirus News Second wave in India: देशात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीन आठवड्यांपासून कमी होताना दिसतेय

coronavirus second wave of COVID 19 may hit India in winter season says Expert panel | CoronaVirus News: देशात कोरोनाची दुसरी लाट येणार?; नीती आयोगानं दिला धोक्याचा इशारा

CoronaVirus News: देशात कोरोनाची दुसरी लाट येणार?; नीती आयोगानं दिला धोक्याचा इशारा

Next

गेल्या काही आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. सध्याच्या घडीला उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८ लाखांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण सध्या कमी झालं असलं तरी धोका कायम आहे. लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली.

देशातल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचं नेतृत्त्व व्ही. के. पॉल यांच्याकडे आहे. 'गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली आहे,' अशी माहिती पॉल यांनी दिली.

सध्याच्या घडीला काही राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं पॉल यांनी सांगितलं. केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह ३-४ केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं पॉल म्हणाले. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र संकट अद्याप कायम आहे,' असं पॉल म्हणाले. हिवाळ्याच्या दिवसांत देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते का, असा प्रश्न विचारला असता पॉल यांनी युरोपमधील परिस्थितीचा संदर्भ दिला. 'हिवाळा सुरू होताच युरोपमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढू शकतो,' असं पॉल यांनी म्हटलं.

'देशात कोरोनाची दुसरी लाट येणारच नाही, असं म्हणता येणार नाही. हिवाळा सुरू होताच उत्तरेकडील राज्यांमधील प्रदूषण वाढतं. त्यातच आता देशात सण उत्सवांना सुरुवात होते. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. पुढील काही महिने आव्हानात्मक आहेत. त्यामुळे काळजी न घेतल्यास आतापर्यंत कमावलेल्या गोष्टी गमावण्याची वेळ येईल,' अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली.
 

Web Title: coronavirus second wave of COVID 19 may hit India in winter season says Expert panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.