coronavirus: सीरम, भारत बायोटेककडून मागविला लसीच्या सुरक्षेबाबतचा आणखी तपशील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 02:07 AM2020-12-11T02:07:17+5:302020-12-11T07:06:40+5:30

coronavirus: कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराकरिता अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांकडून त्यांच्या लसीबाबत आणखी माहिती केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मागविल्याने ही लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

coronavirus: Serum, India Biotech requested more details on vaccine safety | coronavirus: सीरम, भारत बायोटेककडून मागविला लसीच्या सुरक्षेबाबतचा आणखी तपशील

coronavirus: सीरम, भारत बायोटेककडून मागविला लसीच्या सुरक्षेबाबतचा आणखी तपशील

Next

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराकरिता अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांकडून त्यांच्या लसीबाबत आणखी माहिती केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मागविल्याने ही लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. 
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या समितीने या लसी आणखी किती सुरक्षित व प्रभावी आहेत याची माहिती मागविली आहे. सीरमला कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सुरक्षा  निष्कर्षांची अधिक माहिती सादर करण्यास सांगितले आहे. कोविशिल्डच्या इंग्लंडमधील प्रयोगांच्या निष्कर्षांचा तपशीलही मागविला आहे. भारत बायोटेककडेही लसीच्या चाचण्यांबाबत निष्कर्षांची सविस्तर माहिती मागितली आहे. 

अधिक मुदत हवी
फायझरची लस ब्रिटनच्या नागरिकांना देण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीने भारतात लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेल्या अर्जाबाबत आणखी सादरीकरण करायचे असल्याचे सीडीस्कोला कळविले आहे. त्यासाठी वाढीव मुदत मागून घेतल्याने फायझरच्या अर्जावर या समितीने अद्याप विचार केलेला नाही.
 

Web Title: coronavirus: Serum, India Biotech requested more details on vaccine safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.