CoronaVirus शाहीन बाग बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; दिल्लीमध्ये 24 तासांत ६२ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 08:54 AM2020-04-17T08:54:45+5:302020-04-17T09:03:03+5:30
एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने दिल्ली सरकारने कोरोना प्रभावित परिसरामध्ये वाढ केली असून ६० प्रभागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे.
नवी दिल्ली : नागरिकता सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर या केंद्र सरकारच्या महत्वाच्या कायद्यांविरोधातील आंदोलनामुळे देशभर गाजलेला नवी दिल्लीतील शाहीन बाग परिसर आता पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. कारण कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले असून गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये ६२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने दिल्ली सरकारने कोरोना प्रभावित परिसरामध्ये वाढ केली असून ६० प्रभागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. यामध्ये सीएएविरोधातील आंदोलकांचा शाहीन बाग हा एरियाही आला आहे.
गुरुवारी काही भागांचा समावेश करण्यात आला. यामध्ये शाहीन बाग, अबुल फजर एन्क्लेव्हच्या आसपासचा परिसर आणि शाहदरामध्ये राम नगरचा काही भाग आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीच्या ६० भागांना सील करण्यात आले आहे. याशिवाय ऑपरेशन शील्डही या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागामध्ये राबविण्यात येत आहे.
रोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत १६४० रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये दोन दिवसांत रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली होती. मात्र, पुन्हा आज वाढ झाली आहे.
वसुंधरा एनक्लेवमध्ये मनसारा अपार्टमेंटमध्ये एक कोरोनाग्रस्त सापडला होता. यामुळे या भागाला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. या व्यक्तीने सोसायटीच्या सर्व सार्वजनिक सुविधा वापरल्या आहेत. यामुळे या सोसाटीतील १८८ घरांना धोका जाणवू लागला आहे. खबरदारी म्हणून ही सोसायटी आणि आसपासचा भाग सील करण्यात आला आहे.
आनंदवार्ता! ६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले; रुग्णांवर परीक्षण सुरु
आजचे राशीभविष्य - 17 एप्रिल 2020