Coronavirus: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने फोन करून केली प्रकृतीची विचारपूस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:11 PM2022-01-24T16:11:47+5:302022-01-24T16:13:49+5:30

Sharad Pawar News: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आल्यानंतर पंतप्रधान Narendra Modi यांनी शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Coronavirus: Sharad Pawar was infected with coronavirus, Prime Minister Narendra Modi immediately called and inquired about his health. | Coronavirus: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने फोन करून केली प्रकृतीची विचारपूस 

Coronavirus: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने फोन करून केली प्रकृतीची विचारपूस 

Next

मुंबई/ नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळींकडून रीघ लागली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मला फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे शरद पवार यांनी ट्विट केले.

शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आज दुपारी आले. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं होतं.  

Web Title: Coronavirus: Sharad Pawar was infected with coronavirus, Prime Minister Narendra Modi immediately called and inquired about his health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.