Coronavirus: धक्कादायक ! लखनौच्या मस्जिदमध्ये छापा, १३ विदेशी मुसलमान पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:32 PM2020-03-31T16:32:30+5:302020-03-31T16:34:38+5:30

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे

Coronavirus: Shocking! Raid in Lucknow mosque, 13 foreign Muslim police in custody lakhnow | Coronavirus: धक्कादायक ! लखनौच्या मस्जिदमध्ये छापा, १३ विदेशी मुसलमान पोलिसांच्या ताब्यात

Coronavirus: धक्कादायक ! लखनौच्या मस्जिदमध्ये छापा, १३ विदेशी मुसलमान पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

नवी दिल्ली -  निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मरकजनंतर आता लखनौमधील एका मस्जीदमध्ये अनेक विदेशी मुस्लीम लपून बसल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत माहिती मिळताच, जिल्हाधिकारी, पोलीस आयक्त आणि पोलीस अधिक्षकांनी छापा टाकू १३ विदेशी नागिरकांना मस्जीदमधून बाहेर काढलं आहे. विशेष म्हणजे १३ मार्चपासून हे लोक मस्जीदमध्ये लपून बसले होते, असे सांगण्यात येत आहे. तर, तबलीगी जमातच्या इस्लामी रॅलीतही ले लोक सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, सरकारच्या नियमांचे पालन न करता लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र काही राजकीय नेत्यांकडून कोरोना व्हायरसच्या आपत्तीत देखील राजकारण करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने मुस्लिमांना अजानसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालमधील या टीएमसी नेत्याचे नाव अख्तर हुसैन आहे. देशात लॉकडाउन असताना देखील लोकांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळी वाजवून कोरोनाला रोखू शकतात तर मग कोरोनाला मात देण्यासाठी आपण प्रार्थना  का करू नये, असा अजब सवाल केला. राजकीय नेत्यांच्या अशा भडकाऊ भाषणामुळे लोकांकडून नियमांचे पालन न होता, उल्लंघन होत आहे. लखनौ येथे १३ विदेशी मुस्लीम मस्जीदमध्ये लपून बसल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने यांना ताब्यात घेतलं आहे.  

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार गुप्तचर आणि एलआययुच्या सूचनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने मस्जीदमध्ये छापेमारी केली. त्यानंतर, येथे सापडलेल्या विदेशी नागरिकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. त्यानंतर, सर्वांनाच आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या विदेशी नागरिकांची संख्या ६ असून ते कझाकिस्तान येथून भारतात आले आहेत. तर, मडियांव प्रभागातील रॅलीत सहभागी झालेले ७ मुस्लीम नागरिकही येथे आढळून आले आहेत. हे सर्व बांग्लादेशी नागरिक असून लखनौ मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. 

दरम्यान दल्लीतील निजामुद्दीन येते तबलीगी जमातच्या मरकजमध्ये उत्तर प्रदेशातील जवळपास १६० लोकं सहभागी झाले होते. पोलीस सध्या या सर्व नागरिकांचा शोध घेत आहे. 

Web Title: Coronavirus: Shocking! Raid in Lucknow mosque, 13 foreign Muslim police in custody lakhnow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.