Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, ‘आर व्हॅल्यू’ पोहोचली १ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:28 AM2021-08-03T09:28:44+5:302021-08-03T09:29:59+5:30

Coronavirus: निर्बंध शिथिल करा अशी मागणी करणारे व्यापारी आणि टाळेबंदीला कंटाळलेली जनता यांच्या कचाट्यात सापडलेल्या सरकारी यंत्रणांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीनेही सतावले आहे.

Coronavirus: signs of the third wave of Coronavirus | Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, ‘आर व्हॅल्यू’ पोहोचली १ वर

Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, ‘आर व्हॅल्यू’ पोहोचली १ वर

Next

निर्बंध शिथिल करा अशी मागणी करणारे व्यापारी आणि टाळेबंदीला कंटाळलेली जनता यांच्या कचाट्यात सापडलेल्या सरकारी यंत्रणांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीनेही सतावले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता ‘आर व्हॅल्यू’ ही १.० वर पोहोचली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे हे संकेत मानले जात आहेत.  

सरकारचे म्हणणे काय? 
-‘आर व्हॅल्यू’ १.० वर पोहोचणे ही चिंतेची बाब असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. 
- ‘आर व्हॅल्यू’ वाढणे म्हणजे एका कोरोनाबाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची तीव्रता वाढीस लागणे. 
- उदाहरणार्थ ०.७ ते ०.९ या श्रेणीत ‘आर व्हॅल्यू’ असेल तर १० कोरोनाबाधित व्यक्ती ७ ते ९ लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात. ‘आर व्हॅल्यू’ कमी झाली तर संसर्ग पसरण्याची शक्यताही घटते. 

‘आर व्हॅल्यू’ म्हणजे काय, ती कशी मोजतात?
- डेटा सायन्सनुसार रिप्रॉडक्शन रेट - कोरोना विषाणूचा पुनरुत्पादन दर - म्हणजे ‘आर व्हॅल्यू’. एक बाधित व्यक्ती किती जणांना बाधित करू शकते, हे ‘आर व्हॅल्यू’ सांगते.  

केरळमध्ये ‘आर व्हॅल्यू’ जास्त 
- केरळ राज्यात कोरोनाचे नवे बाधित आढळून येऊ लागले आहेत. केरळची ‘आर व्हॅल्यू’ १.११ एवढी आहे. याचाच अर्थ कोरोना विषाणूचा संसर्ग केरळमध्ये झपाट्याने होत आहे. 
- ईशान्येकडील त्रिपुरा राज्याची ‘आर व्हॅल्यू’ १ पेक्षा कमी आहे.  

लसीकरणाचा वेग वाढवा
‘आर व्हॅल्यू’ कमी करायची असेल तर लसीकरण झपाट्याने होणे गरजेचे आहे.   

कांजिण्यांसारखा संसर्गजन्य
- कोरोनाचा डेल्टा  व्हेरिएंट कांजिण्यांसारखा संसर्गजन्य असू शकतो.
- कांजिण्यांचा संसर्ग दर एका व्यक्तीपासून ८ जणांना असा होता.
- डेल्टा व्हेरिएंट भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळेच दुसरी लाट भारतात तीव्र होती. 

 

Web Title: Coronavirus: signs of the third wave of Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.