कोरोनापासून मुलांना वाचवण्यासाठी दोन आयांची खास 'शक्कल'; ...म्हणून मुलांचीच केली अदलाबदल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:04 IST2020-06-15T17:57:27+5:302020-06-15T18:04:37+5:30
ही घटना आहे, सिक्किमची. या राज्यात कोरोना सर्वात शोवटी पोहोचला. येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास शक्कल लढवली आणि मुलांची आदलाबदल करून टाकली.

कोरोनापासून मुलांना वाचवण्यासाठी दोन आयांची खास 'शक्कल'; ...म्हणून मुलांचीच केली अदलाबदल!
गंगटोक: भगवान श्रीकृष्णांना जन्म दिला माता देवकीने, पण मातृत्वाची सावली दिली यशोदा माईने. कोरोना महामारीच्या काळात अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. येथे दोन आया एकमेकांच्या मुलांसाठी यशोदा बनल्या आहेत.
ही घटना आहे, सिक्किमची. या राज्यात कोरोना सर्वात शोवटी पोहोचला. येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास शक्कल लढवली आणि मुलांची आदलाबदल करून टाकली.
झाले असे, की एका महिलेच्या 27 महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली. पण, महिलेचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. हा चिमुकला राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना रुग्ण आहे. संक्रमणामुळे त्याला आईपासून अलग ठेवणे आवश्यक होते. मात्र, एवढ्या छोट्या मुलाला वेगळे ठेवणार कसे? हा प्रश्न होता.
चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!
तर दुसरीकडे आणखी एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा पूर्णपणे ठणठणीत आहे. मग काय, कोरोना संक्रमणापासून एकमेकांच्या मुलांचे रक्षण करण्यासाठी या आयांनी मुलांची अदालबद केली.
त्यामुळे आता, संक्रमित चिमुकल्याची जबाबदारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेवर आहे. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ही महिलेच्या निगेटिव्ह मुलाची जबाबदारी दुसऱ्या महिलेवर आहे.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही