CoronaVirus: तमिळनाडूत रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाले बरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:05 AM2020-04-23T02:05:44+5:302020-04-23T02:07:28+5:30

निर्बंधांची कडक अंमलबजावणी

CoronaVirus situation in Tamil nadu improving after many patients recovered | CoronaVirus: तमिळनाडूत रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाले बरे!

CoronaVirus: तमिळनाडूत रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाले बरे!

Next

चेन्नई : तमिळनाडूमध्ये मंगळवारी कोरोनाच्या आढळून आलेल्या ७८ नव्या रुग्णांपेक्षा या साथीतून उपचारांनंतर बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या दुपटीहून अधिक म्हणजे १७८ इतकी होती. ही या राज्याला दिलासा देणारी बाब आहे. मात्र, त्यामुळे हुरळून न जाता लॉकडाऊनमधील निर्बंधांची आणखी कडक अंमलबजावणी सुरू आहे.

या संदर्भात तमिळनाडू राज्याच्या आरोग्य विभागाने पत्रकात म्हटले आहे, की सध्या राज्यामध्ये रुग्णांची संख्या ९४० पेक्षा अधिक आहे. आतापर्यंत कोरोनाचे ६३८ रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी १ जण मरण पावला असून तेथील एकूण बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे.

चेन्नईमध्ये या दिवशी ५५ नवे रुग्ण आढळून आले. त्यांतील २६ जण खासगी टीव्ही चॅनलचे कर्मचारी आहेत. तेथील एका कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याचा संसर्ग इतर सहकाऱ्यांनादेखील झाला.

Web Title: CoronaVirus situation in Tamil nadu improving after many patients recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.