CoronaVirus : आणखी सहा कोरोना लसी भारतात येणार - हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:52+5:302021-03-14T06:49:41+5:30

डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढेही सुरू ठेवावे.

CoronaVirus: Six more Corona vaccines to arrive in India says Harsh Vardhan | CoronaVirus : आणखी सहा कोरोना लसी भारतात येणार - हर्षवर्धन

CoronaVirus : आणखी सहा कोरोना लसी भारतात येणार - हर्षवर्धन

Next

भोपाळ : आणखी सहापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसी भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ( Harsh Vardhan) यांनी शनिवारी दिली. भारताने कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या दोन लसी विकसित केल्या असून त्यांचा जगभरातील ७१ देशांना पुरवठा करण्यात आला आहे. कॅनडा, ब्राझीलसारख्या विकसित देशांचाही त्यात समावेश आहे, असे ते म्हणाले. (CoronaVirus: Six more Corona vaccines to arrive in India says Harsh Vardhan)

डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढेही सुरू ठेवावे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्युदर सर्वात कमी आहे. कोरोनावर आता लसही उपलब्ध आहे. असे असले तरी लोकांनी निष्काळजीपणे वागू नये. 

गेल्या महिन्यापासून देशातील सहा राज्यांत विशेषत: महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. वारंवार आवाहन करून लोक कोरोना प्रतिबंधक नियम पाळत नसल्याने या सहा राज्यांतील अनेक गावे, शहरांमध्ये पुन्हा मर्यादित स्वरूपात का होईना लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus: Six more Corona vaccines to arrive in India says Harsh Vardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.