coronavirus : म्हणून सहा वर्षांच्या मुलीला हवाई दलाच्या विशेष विमानातून आणले भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:28 AM2020-04-27T09:28:11+5:302020-04-27T09:42:50+5:30
भारतीय हवाई दलाच्या विमानाने विशेष उड्डाण करून कुवेतमधून एका मुलीला भारतात आणले.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लोक देश-विदेशात अडकून पडले आहेत. मात्र अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या विमानाने विशेष उड्डाण करून कुवेतमधून एका मुलीला भारतात आणले.
देशात कोरोनाचे संकट घोंघावत असताना मानवतावादी दृष्टिकोन ठेऊन या सहा वर्षीय मुलीला भारतात आणले. कर्करोगाशी झुंजत असलेल्या या मुलीला आणि तिच्या वडिलांना कुवेतमधून हवाई दलाच्या विमानाने भारतात आणले गेले. या मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया होणार आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ही मुलगी तिच्या वडिलांच्या कडेवर दिसत आहे.
'कोरोनाच्या संकटादरम्यान हवाई दलाचे एक विमान मानवतावादी मोहिमेंतर्गत कुवेतला गेले. तिथून या मुलीला आणि तिच्या वडिलांना घेऊन आले. ही सहा वर्षीय मुलगी ब्रेन ट्युमर ने पीडित असून, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.