Coronavirus: दुबईहून परतलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला; आईला भेटण्यासाठी देशात आला पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:07 AM2020-05-26T10:07:37+5:302020-05-26T10:11:43+5:30

दुबईमधील नोकरी सोडून मुलगा आईच्या भेटीसाठी दिल्ली येथे आला. मात्र त्याला १४ दिवसांच्या क्वारंटाईनला पाठवण्यात आले.

Coronavirus: Son returned from Dubai to meet Mother but Unfortunately she died pnm | Coronavirus: दुबईहून परतलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला; आईला भेटण्यासाठी देशात आला पण...

Coronavirus: दुबईहून परतलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला; आईला भेटण्यासाठी देशात आला पण...

Next
ठळक मुद्देगेल्या २ महिन्यापासून आजारी आईला भेटण्यासाठी मुलगा होता व्याकूळदुबईहून परतल्यानंतर १४ दिवस सरकारने केलं क्वारंटाईनमुलगा क्वारंटाईनमध्ये असताना आईचा झाला दुर्दैवी अंत

नवी दिल्ली – सध्या कोरोनामुळे लोकांचे जीवनमान बदललं आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक केले आहे. कोरोनाच्या या बिकट काळात एक ह्दयद्रावक घटना समोर येत आहे. दुबईहून दिल्लीला आपल्या आईला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आईचं अंत्यदर्शनही करता आलं नाही अशी दुर्दैवी वेळ आली आहे.

दुबईमधील नोकरी सोडून मुलगा आईच्या भेटीसाठी दिल्ली येथे आला. मात्र त्याला १४ दिवसांच्या क्वारंटाईनला पाठवण्यात आले. त्यामुळे मुलाला आपल्या आईच्या भेटीसाठी प्रतिक्षा करावी लागली. पण दुर्दैवाने याच कालावधीत मुलाला आपली आई गेल्याची दु:खद बातमी मिळाली. क्वारंटाईन केल्यामुळे मुलाला त्याच्या आईच्या अंत्यदर्शनासाठीही जाता आले नाही.

काही वर्षांपूर्वी ३० वर्षीय खान दुबईला कामाच्या निमित्ताने गेला होता. 13 मे रोजी खान भारतात परतला. शनिवारी त्यांच्या आईच्या मृत्यूची बातमी त्यांना समजली. रविवारी केंद्र सरकारने विदेशातून येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली. यात पहिल्या ७ दिवसांसाठी प्रवाशांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल त्यानंतर उर्वरित ७ दिवसानंतर त्यांच्या घरीच क्वारंटाईन होण्यास सांगितले. सरकारने विशेष बाबीत १४ दिवस घरात क्वारंटाईन होण्याची परवानगी दिली आहे. मी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचनांचा हवाला देत घरी जाण्याची परवानगी मागितली होती, मी सर्व खबरदारी घेईन, तपासणीसाठीही तयार आहे असं खान यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, तरीही त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली नाही.

खान यांनी पहिल्यांदा विचार केला होता की, ते भारतात आल्यानंतर एक महिना त्यांच्या आईसोबत राहतील. मागील २ महिन्यापासून मी आईची भेट घेईन या विचारात होता. त्यासाठी मी दुबईतील नोकरी सोडून आईच्या भेटीला आलो. सर्व अडचणींचा सामना केला पण आईचं अखेरचं दर्शनही मला झालं नाही. आम्ही कोरोनासोबत जगायला शिकू पण ज्या मनातील भावनांचे नुकसान झालं ते कायम आमच्यासोबत राहील अशी भावूक प्रतिक्रिया खान यांनी दिली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’च्या वापराबाबत WHO चा इशारा; औषधाची ट्रायल करण्यास बंदी

...अन् शरद पवारांनी थेट 'मातोश्री' गाठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तब्बल २ तास चर्चा

म्हणून पवार अनपेक्षितपणे 'राजभवन'वर गेले; राज्यपाल 'शरदबाबूं'ना म्हणाले...

...म्हणून पतीने Youtube वरुन साप पकडण्याचं ट्रेनिंग घेतलं; पत्नीच्या हत्येची धक्कादायक कबुली!

 

 

 

Web Title: Coronavirus: Son returned from Dubai to meet Mother but Unfortunately she died pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.