मोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 05:32 PM2020-05-01T17:32:14+5:302020-05-01T17:53:13+5:30
लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर आणि विद्यार्था तसेच इतर व्यक्तींसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर तसेच इतर लोक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लॉकडाऊन दरम्यान, परराज्यात अडकून पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
याबाबत माहिती देताना गृहमंत्रालयाने सांगितले की,’लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सर्व सुरक्षाविषय उपायांसह त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी परवानगी दिली आहे.’ काही दिवसांपूर्वी केंद्र सरकराने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच राज्यांनी मजुरांना परत आणण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Movement of migrant workers, pilgrims, tourists, students & other persons, stranded at different places, is also allowed by #SpecialTrains to be operated by @RailMinIndia. MoR to designate nodal officer(s) for coordinating with States/ UTs for their movement#lockdown#Covid_19pic.twitter.com/UvEvDH1Ibj
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) May 1, 2020
दरम्यान, तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन आज झारखंडला पोहोचेल. या ट्रेनमधून एकूण १२०० मजूर प्रवास करत आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथून एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन रात्री ११ वाजता झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण १२०० मजूर असून, फिजिकल डिस्टंसिग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Ministry of Home Affairs allows the movement of migrant workers, tourists, students and other persons stranded at different places, by special trains. pic.twitter.com/cYFRCvTBLj
— ANI (@ANI) May 1, 2020