Narendra Modi: राज्यांनी लाॅकडाऊनचा पर्याय शेवटचा ठेवावा; पंतप्रधानांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:54 AM2021-04-21T05:54:13+5:302021-04-21T05:54:40+5:30
Narendra Modi on Lockdown: फार्मा कंपन्यांनी औषधांचे उत्पादन वाढवले आहे. सर्व कंपन्यांची सरकार मदत घेत आहे. आपण रुग्णालयांत बेड्सची संख्या वाढवत आहोत, मोठी कोविड केंद्रे उभारत आहोत. या संकटकाळात लोकांच्या सेवेसाठी मेहनत करणाऱ्या आरोग्य सेवकांना धन्यवाद देतो असेही पंतप्रधान म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात कोरोना संसर्गाचे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोनाशी लढूया, असे सांगत राज्यांना हे करीत असताना राज्यांनी लॉकडाऊन टाळावेत, तो शेवटचा पर्याय असायला हवा, असे आवाहन केले.
फार्मा कंपन्यांनी औषधांचे उत्पादन वाढवले आहे. सर्व कंपन्यांची सरकार मदत घेत आहे. आपण रुग्णालयांत बेड्सची संख्या वाढवत आहोत, मोठी कोविड केंद्रे उभारत आहोत. या संकटकाळात लोकांच्या सेवेसाठी मेहनत करणाऱ्या आरोग्य सेवकांना धन्यवाद देतो असेही पंतप्रधान म्हणाले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट
खूप मोठी आहे. परंतु आरोग्य यंत्रणा, योग्य योजना, पुरेसा औषध पुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करूया. लोकांचे साहस, शिस्त आणि त्यांचे प्रयत्न याद्वारे आपण कोरोनाविरोधात लढूया. देशात ऑक्सिजन उत्पादन आणि सर्वांना पुरवठा यासाठी सर्वतोपरी आपण सर्व प्रकारे प्रयत्न करू.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मर्यादांचे पालन करा
n रामनवमीच्या पूर्वसंध्येला आवाहन आहे की, मर्यादांचे पालन करा, कोरोनापासून वाचण्याच्या सर्व उपायांचे १०० टक्के पालन करा.
n रमजान महिन्याचा सातवा दिवस आहे. रमजान धैर्य, आत्मसंयम व अनुशासनाचे धडे देतो. लोकांनी त्याचे काटेकोर पालन करावे.
n सरकारी रुग्णालयांत मोफत लस यापुढेही दिली जाईल. सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारे प्रयत्न करीत आहेत.
n मजुरांचे काम बंद होऊ नये आणि त्यांना लस मिळावी, अशी योजना आहे. त्यामुळे मजुरांनी गावी जाऊ नये.
n गाव, वाडी, सोसायटीच्या पातळीवर कोरोनाविरोधी समित्या स्थापून प्रयत्न करावेत.
n माध्यमांनीही जनजागृती करावी आणि लोकांमधील भीती दूर करावी.