"माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा, अन्यथा..." तरुणाचं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:02 PM2021-05-17T13:02:07+5:302021-05-17T13:03:46+5:30
Jara hatke News: शेकडो जणांनी हे ट्विट लाइक केले आहे. काहीजण या तरुणाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
पाटणा - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनचा अवलंब केला जात आहे. बिहारमध्येही लॉकडाऊनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचे पाहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बिहारमध्ये १६ मे ते २५ मे या काळातही लॉकडाऊन लागू राहणार आहे. या काळात कठोर निर्बंध लागू राहणार असून, विवाह सोहळ्यांमध्येही केवळ २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. ( "Stop my girlfriend's wedding, otherwise ..." Young man tweeted directly to Bihar CM Nitish Kumar)
दरम्यान, लॉकडाऊन वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर एका तरुणाने ट्विटरवर मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट केले आहे. पंकजकुमार गुप्ता असे या तरुणाचे नाव असून, केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणतो की, सर जर तुम्ही लग्न विवाहांनाही बंदी घातली असती तर १९ मे रोजी होणारा माझ्या गर्लफ्रेंडचा विवाह थांबला असता. त्यासाठी मी तुमचा जन्मभर ऋणी राहीन. दरम्यान, या तरुणाने केलेल्या या मागणीची ट्विटरवर खूप चर्चा सुरू आहे.
शेकडो जणांनी हे ट्विट लाइक केले आहे. काहीजण या तरुणाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याची मदत केली पाहिजे असे म्हणत आहेत. तर काहीजण आता लग्न थांबल्यास लॉकडाऊननंतर लग्न करणार की नाही? असा प्रतिप्रश्न त्याला विचारत आहेत.
लोक प्रेम करणाऱ्यांचे शत्रू आहेत, असे अजय पटेल नावाच्या ट्विटर युझरने म्हटले आहे लॉकडाऊनच्या बहाण्याने आपली मागणी पुढे करणाऱ्या या तरुणाचे ट्विटर भलतेच व्हायरल होत आहे. तसेच ते चर्चेचा विषय ठरले आहे.