Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:10 PM2020-04-09T16:10:40+5:302020-04-09T16:13:19+5:30
Coronavirus : देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
चेन्नई - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट चुकून निगेटिव्ह समजून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तामिळनाडूमधील विल्लूपूरमच्या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या https://t.co/9GFRkiF83C#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2020
रुग्णालयातील रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी चुकून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवण्यात आला आणि त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र नंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली. हा प्रकार समोर आल्यावर तातडीने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान तीन कोरोनाग्रस्तांना शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र कोरोनाचा एक रुग्ण अद्याप सापडलेला नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारचा ‘बिग प्लॅन’; तीन टप्प्यांची आखली रणनीती #COVID2019india#NarendraModihttps://t.co/Z2bn9d6m20
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2020
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,550 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 15,19,571 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5000 वर पोहचली आहे. तर 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या
Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार
Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर
CoronaVirus: चिंतेत भर! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर; एकट्या मुंबईत ८५७ रुग्ण