Coronavirus: रुग्णांच्या टक्केवारीत तेलंगणा पहिल्या स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:46 AM2020-07-03T00:46:58+5:302020-07-03T00:48:16+5:30
या आठवड्यात चाचण्या होणार एक कोटी
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांचा टक्केवारीत विचार केला तर तेलंगणा गुरुवारी देशात पहिल्या स्थानी होते. त्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी गेला. या आधीच केंद्राने तेलंगणाला जास्तीत जास्त चाचण्या करण्यास सांगितले होते. दिल्लीत रोजच्या रोज कोविड-१९चे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारची काळजी वाढवली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यांत रुग्णसंख्या खाली येत आहे.
‘लोकमत’ला आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात रुग्ण (पॉझिटिव्ह केसेस) १८.७ टक्के तर दिल्लीत १६.३ टक्के आहेत. महाराष्ट्रात १.८६ लाख तर दिल्लीत ८९८०२ आहेत त्या तुलनेत तेलंगणमध्ये ते १७३५७ आहेत. परंतु, या राज्यांनी फेब्रुवारीपासून विक्रमी संख्येत चाचण्या केल्या असून सततच्या प्रयत्नांनी तेथील रुग्ण संख्या घसरत चालली आहे.
केंद्र सरकारने आणि उच्च न्यायालयाने तेलंगणला कमी चाचण्या करत असल्यामुळे फटकारले नसते तर एवढे रुग्ण तेथे उघड झाले नसते. तेलंगणमध्ये रोज होणाºया चाचण्या १७ जून रोजी फक्त १०९६ होत्या. त्या आता एक जुलैच्या रात्री ७६९१ झाल्या.
१७ जून रोजी तेलंगणमध्ये २६९ रुग्ण होते ते एक जुलै रोजी १७३५७ झाले. ही वाढ फक्त पंधरवड्यात ६० पटींपेक्षा जास्त झाली.
गेल्या १५ दिवसांत चाचण्या सात पटीत (१०९६ वरून एक जुलै रोजी ७६९१) वाढल्या. शेजारच्या आंध्र प्रदेशने ९.१८ लाख चाचण्या केल्या व त्याचा पॉझिटिव्ह केसेसचा दर हा फक्त १.७ टक्के आहे. हा दर देशात सगळ््यात कमी आहे.
37.37 लाख चाचण्याभारताने ३१ मे रोजी केलेल्या चाचण्यांची संख्या ३७.३७ लाख होती आणि पॉझिटिव्ह केसेसे होत्या ४.९ टक्के. आता हा दर ६.७ टक्के आहे. संख्येचा विचार केला तर रुग्ण १.८२ लाखांवरून ६.०४ लाख झाले आहेत. भारतात एक कोटी चाचण्या पूर्ण होतील तेव्हा तो एक विक्रम ठरेल. गुरुवारी देशात दररोज जवळपास २.३० लाख चाचण्यांची नोंद झाली. तामिळनाडूने 12.02 लाख चाचण्याकेल्या व त्याचा पॉझिटिव्ह केसेसचा दर ७.८ टक्के आहे. सर्वात जास्त 50,825चाचण्या करून घेण्यात महाराष्ट्र हा देशात पहिल्या स्थानावर होता.