CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:06 AM2021-05-13T06:06:06+5:302021-05-13T06:10:23+5:30

कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रभावी ठरल्या आहेत.

CoronaVirus: Test approved for vaccines for children between the ages of 2 to 18 | CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी

CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी

googlenewsNext

 
नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत प्रभावी ठरलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या पुढील टप्प्यातील चाचण्यांना केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली आहे. २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी या चाचण्या घेण्यात येतील.

कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रभावी ठरल्या आहेत. कोव्हॅक्सिन ही लस २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही देता येईल किंवा कसे, हे पाहण्यासाठी या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली.
 
भारत बायोटेकतर्फे तशी परवानगी समितीकडे मागितली होती. कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ५२५ जणांवर करण्यात येतील. दिल्ली व पाटण्यातील एम्स आणि नागपुरातील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या तीन ठिकाणी या चाचण्या केल्या जातील. 

    त्यांचा अभ्यास केला 
-  कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अहवाल तज्ज्ञ समितीकडे सादर केल्यानंतर त्यांचा अभ्यास केला जाईल. 
-  ते समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील टप्प्याला सुरुवात केली जाईल, असे समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
 

Web Title: CoronaVirus: Test approved for vaccines for children between the ages of 2 to 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.