Coronavirus : पुढच्या सहा ते आठ महिन्यांत देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:02 AM2022-02-22T09:02:54+5:302022-02-22T09:03:31+5:30

Coronavirus In India: कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर आता कोरोनाची चौथी लाट येणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता कोविड-१९ टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर विषाणूचा एक व्हेरिएंट आला तर कोरोनाची पुढील लाट येत्या सहा किंवा आठ महिन्यांमध्ये येऊ शकते.

Coronavirus: The next wave of coronavirus will hit the country in the next six to eight months, important information provided by Covid Task Force officials | Coronavirus : पुढच्या सहा ते आठ महिन्यांत देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 

Coronavirus : पुढच्या सहा ते आठ महिन्यांत देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 

Next

नवी दिल्ली - पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत बऱ्यापैकी सौम्य असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली आहे. मात्र कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर आता कोरोनाची चौथी लाट येणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता कोविड-१९ टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर विषाणूचा एक व्हेरिएंट आला तर कोरोनाची पुढील लाट येत्या सहा किंवा आठ महिन्यांमध्ये येऊ शकते. त्याबरोबरच त्यांनी हा दावा केला की, ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट बीए.२, बीए.१ च्या तुलनेत संसर्गजन्य आहे. मात्र तरीही तो संभाव्य लाटेचे कारण ठरणार नाही.

त्यांनी सांगितले की, तोपर्यंत आम्ही ओमायक्रॉनच्या खालच्या टप्प्यात आहोत. मात्र हा विषाणू आपल्या आसपास आहे. ज्याचा अर्थ आपल्याला याच्या संसर्गापासून वाचण्यासाठी शक्यतोपरी प्रयत्न केल पाहिजेत. ओमायक्रॉन बीए.२ मुळे कोरोनाची एक अजून लाट येण्याची शकयतेबाबत बोलताना कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे आधीच कोविड-१९ च्या बीए.१ सब व्हेरिएंटपासून बाधित झालेले आहेत त्यांना बीए.२ बाधित करू शकत नाही.

डॉ. जयदेवन यांनी एएनआयला सांगितले की, ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट बीए.२ पासून कोरोनाची अजून एक लाट येणार नाही. बीए.२ त्या लोकांना बाधित करण्यामध्ये सक्षम नाही आहे, जे आधीच बीए.१ च्या संसर्गामधून बरे झाले आहेत. हा कुठलाही नवा विषाणू किंवा स्ट्रेन नाही आहे. बीए.२ ओमायक्रॉनचा एक उपवंश आहे.

डॉ. जयदेवन यांनी सांगितले की, ओमायक्रॉनप्रमाणे भविष्यातील  कोरोना व्हेरिएंटसुद्धा व्हॅक्सिन इम्युनिटी दाखवू शकतात. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू आपली शक्ती वाढवण्यासाठी सातत्याने विकसित होत आहे. तो अधिकाधिक लोकांना संक्रमित करण्यासाठी आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि लसीकरणातून आलेल्या प्रतिकारशक्तीला हवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.  

Web Title: Coronavirus: The next wave of coronavirus will hit the country in the next six to eight months, important information provided by Covid Task Force officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.