coronavirus : कोरोना चाचण्या घेण्यामध्ये या राज्यांनी घेतली आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:12 PM2020-04-29T17:12:14+5:302020-04-29T17:14:03+5:30
नवी दिल्ली - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगसोबतच अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. ...
नवी दिल्ली - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगसोबतच अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना शोधून काढण्यात यश मिळत आहे. दरम्यान, अधिकाधिक चाचण्या घेण्यामध्ये दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी आघाडी घेतली आहे. तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये कोरोनाच्या सर्वात कमी चाचण्या झाल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे सरासरी 483 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर राज्यवार विचार केल्यास दिल्लीमध्ये 25 एप्रिलपर्यंत दर दशलक्ष लोकसंख्येमागे.1760 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये दर दहा लाख लोकांमागे 1171 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तामिळनाडूमध्ये दर दहा लाख लोकांमागे 1058 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. राजस्थानमध्ये दर दशलक्ष लोकांमागे. 1011 चाचण्या होत आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये दर दहा लाख लोकांमागे 964 कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. या यादीत महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात दर दहा लाख लोकांमागे 818 चाचण्या होत आहेत. तर गुजरातमध्ये दर दशलक्ष लोकांमागे 701 कोरोना चाचण्या होत आहेत.
तर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या सर्वात कमी चाचण्या होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये दर दहा लाख लोकांमागे केवळ 100 चाचण्या होत आहेत. तर बिहारमध्ये दर दहा लाख लोकांमागे 130 तर उत्तर प्रदेशमध्ये 246 कोरोना चाचण्या होत आहेत.