Coronavirus : लग्नासाठी मिळाली होती सुट्टी, देशहितासाठी त्या कर्मवीरांनी केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 06:36 PM2020-04-13T18:36:11+5:302020-04-13T18:39:14+5:30
Coronavirus : एप्रिल महिन्यात ठरलेला विवाहसोहळा रद्द करून पोलीस कॉन्स्टेबल लॉकडाऊनमध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचू नये म्हणून कार्यरत आहेत.
जयपूर - कोरोनाची लढाई लढण्यासाठी सर्वजण आपल्यापरीने योगदान देत आहेत. मात्र, पोलीस दलातील काही जणांनी कर्तव्यनिष्ठपणा कायम जपला आहे. एप्रिल महिन्यात ठरलेला विवाहसोहळा रद्द करून पोलीस कॉन्स्टेबल लॉकडाऊनमध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचू नये म्हणून कार्यरत आहेत.
सांगानेर पोलीस ठाण्याचे टिंकू कुमावत आणि मुकेश चौधरी, मोतीडुंगरी पोलीस ठाण्याचे शिवकुमार, टोंकच्या मालपुरा पोलीस ठाण्यातील ओमप्रकाश आणि निरंध कुमार यामध्ये सामील आहेत. पिंटू कुमावत यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील वाटल्या होत्या. राजस्थानमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त असतात. अशातच अनेक महिन्यांपूर्वीपासून या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली जाते. पोलीस विभागात भर्ती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसांचे लग्न या दोन महिन्यात ठरले होते. यापैकी काहींनी बँड बाजा, घोडी आदी सर्व काही बुक केले होते, त्यासह निमंत्रण पत्रिका देखील छापून वाटल्या होत्या.
मिळालेली सुट्टी केली रद्द
सुट्टी मिळाली होती. दरम्यान, 22 मार्चला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली यातच पोलीस कॉन्स्टेबलने कौटुंबिक जबाबदारीपेक्षा आपले कर्तव्य महत्वाचं मानत विवाह स्थगित केला.
सांगानेर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल टिंकू कुमावत यांचे 2 एप्रिलला लग्न ठरले होते. सांगानेर पोलीस ठाण्यात कार्यरत मुकेश चौधरीचा विवाह 26 एप्रिलला होणार होता. मोती डुंगरी ठाण्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशचा विवाह 26 एप्रिलला ठरला होता. तर मालपुरा पोलीस थांबायचे कॉन्स्टेबल निरंध कुमार यांचे लग्न 2 मेला ठरले होते.