CoronaVirus News: देशात सलग तिसऱ्या दिवशी ११ हजारांवर नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:10 AM2020-06-16T03:10:19+5:302020-06-16T03:10:36+5:30

बळींची संख्या साडेनऊ हजारांवर; रुग्णसंख्येत भारत जगात चौथ्या स्थानी

CoronaVirus For the third day in a row 11000 new patient found in india | CoronaVirus News: देशात सलग तिसऱ्या दिवशी ११ हजारांवर नवे रुग्ण

CoronaVirus News: देशात सलग तिसऱ्या दिवशी ११ हजारांवर नवे रुग्ण

Next

नवी दिल्ली : देशभरात सलग तिसºया दिवशी, सोमवारी ‘कोविड-१९’चे ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या
रुग्णांची एकूण संख्या ३.३० लाखांहून अधिक झाली. तर दिवसभरात ३२५ जण मृत्यू पावल्याने देशातील एकूण बळींची संख्या ९ हजार ५०० पार जाऊन पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात सध्या १ लाख ५३ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १ लाख ६९ हजार ७९७ रुग्ण उपचारानंतर या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे उपचाराद्वारे या आजारावर मात करून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ५१.०७ टक्के इतके आहे.

देशातील सोमवारी ११ हजार ५०२ रुग्ण आढळून आले. या दिवशी मरण पावलेल्या लोकांपैकी १२० जण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीमध्ये ५६, तमिळनाडूमध्ये ३८ व गुजरातमध्ये २९ जणांचा सोमवारी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये १४, पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ तर राजस्थान, हरयाणामध्ये प्रत्येकी १० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कर्नाटकमध्ये पाच, जम्मू-काश्मीरमध्ये चार, तेलंगणा, पुडुचेरीमध्ये प्रत्येकी तीन तर आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, पंजाबमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी दोन जणांचा बळी गेला आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा या संसर्गामुळे मृत्यू झाला.

झपाट्याने वाढतेय रुग्णसंख्या
जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका प्रथम स्थानी, दुसºया क्रमांकावर ब्राझील, तिसºया स्थानी रशिया आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.

Web Title: CoronaVirus For the third day in a row 11000 new patient found in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.