CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:32 PM2021-07-16T12:32:51+5:302021-07-16T12:35:06+5:30
CoronaVirus : डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले.
नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे.
डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले. तसेच, कोरोना साथीच्या काळात लोकांची रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशा परिस्थितीत हे कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेचे कारणही बनू शकते. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक सहजपणे कोरोनाच्या या लाटेत येऊ शकतात, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटले आहे.
'Johnson & Johnson' कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सर होण्याचा धोका; सनस्क्रीनमध्ये आढळले 'बेंझिन'! https://t.co/45MD2GmwS7#JohnsonAndJohnson
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2021
जर अशी प्रतिकारशक्ती कमी राहिली तर ते तिसर्या लाटाचे एक मोठे कारण बनू शकते, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितले. याशिवाय, कोरोनाशी लढा देऊन मिळणाऱ्या प्रतिकारशक्तीला देखील नवीन व्हेरिएंट कमकुवत करु शकतो. जर असे घडले तर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट प्रतिकारशक्तीला मागे टाकेल आणि हे संक्रमण खूप वेगाने पसरू शकते, असाही दावा डॉक्टर समीरन पांडा यांनीही केला आहे.
डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट जीवनावर अधिक कहर करतील, असे वाटत नाही, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले होते की, लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. कोरोना संसर्गाचे नवीन व्हेरिएंट येत आहेत, सरकार लॉकडाऊन आणि इतर निर्बंध कमी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.