दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 06:28 AM2021-11-25T06:28:09+5:302021-11-25T06:29:11+5:30
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीबाबत आयसीएमआरचे संचालक डाॅ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या ‘गोईंग व्हायरल’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रणदीप गुलेरिया बोलत होते. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना संसर्गात खूप वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी तीव्र लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याने बूस्टर डोस देण्याचीही आवश्यकता नसून लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची गरज असल्याचे गुलेरिया म्हणाले.
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीबाबत आयसीएमआरचे संचालक डाॅ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या ‘गोईंग व्हायरल’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रणदीप गुलेरिया बोलत होते. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना संसर्गात खूप वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.
सिरो-पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही वाढलेले आहे. सध्या बूस्टर डोस देण्याची गरज नाही. कदाचित भविष्यात त्याची आवश्यकता भासू शकेल. लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली जात असून, कोरोनामुळे प्रकृती गंभीर होण्याच्या, रुग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे निरीक्षणही गुलेरिया यांनी नोंदवले.