चिंताजनक! महाराष्ट्राशेजारील या राज्यात कोरोनाची तिसरी लाट, मुलांमधील संसर्ग वाढला, लॉकडाऊनचेही संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 04:03 PM2021-08-11T16:03:17+5:302021-08-11T16:03:25+5:30

coronavirus in Karnataka: महाराष्ट्राशेजारील कर्नाटकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कर्नाटकमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये किमान २४२ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

coronavirus: Third wave of coronavirus in Karnataka, increased infection among children, also a sign of lockdown | चिंताजनक! महाराष्ट्राशेजारील या राज्यात कोरोनाची तिसरी लाट, मुलांमधील संसर्ग वाढला, लॉकडाऊनचेही संकेत

चिंताजनक! महाराष्ट्राशेजारील या राज्यात कोरोनाची तिसरी लाट, मुलांमधील संसर्ग वाढला, लॉकडाऊनचेही संकेत

googlenewsNext

बंगळुरू - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्यापैकी ओसरल्याने महाराष्ट्रामध्ये आता कोरोनाबाबतचे निर्बंध बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्यासोबत शाळा सुरू करण्याची तयारीही सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राशेजारील कर्नाटकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कर्नाटकमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये किमान २४२ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, ही आकडेवारी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच येत्या १६ तारखेपासून अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Third wave of coronavirus in Karnataka, increased infection among children, also a sign of lockdown)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानच तिसरी लाट ही मुलांसाठी अधिक धोकादायक ठरणार असल्याचे बोलले जात होते. अशा परिस्थितीत कर्नाटकमधून समोर येत असलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. बंगळुरू महानगरपालिकेने सांगितले की, गेल्या पाच दिवसांमध्ये १९ वर्षांखाली २४२ मुलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातच कोरोनाची तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार यामधील १०६ मुलांचे वय ९ वर्षांपेक्षा कमी आहे. तर १३६ मुलांचे वय हे ९ आणि १९ वर्षांच्या दरम्यान आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यामध्ये कोरोनाचे १ हजार ३३८ रुग्ण सापडले होते. तर ३१ जणांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ही तीन पटीने वाढणार आहे. तसेत ही बाब खूप धोकादायक असेल. कर्नाटक सरकारने आधीच सर्व जिल्ह्यांमध्ये नाईट आणि विकेंड संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच केरळ-कर्नाटक आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. यादरम्यान, केवळ आरटी-पीसीआर सर्टिफिकेट असलेल्या प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे.

कर्नाटकमध्ये गेल्या महिनाभरापासून दररोज १५०० नवे रुग्ण सापडत आहेत. नुकतीच राज्याची सूत्रे हाती घेणारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दरमहा लसीकरणाचे प्रमाण ६५ लाखांवरून १ कोटी पर्यंत नेण्याचे आश्वासन दिले आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार १६ ऑगस्टपासून राज्यामध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २९ लाख २१ हजार ०४९ रुग्ण सापडले आहेत. तर ३६ हजार ८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २२ हजार ७०२ जणांचा मृत्यू झाला आहे.  

Web Title: coronavirus: Third wave of coronavirus in Karnataka, increased infection among children, also a sign of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.