Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील; सुब्रमण्यम स्वामींच्या इशाऱ्याने उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:21 AM2021-05-06T08:21:27+5:302021-05-06T08:24:24+5:30
Corona Virus third wave: सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. एवढ्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर राहिलेल्या स्वामी यांनी कोरोना तिसऱ्या लाटेच्या दाव्यावर कोणत्याही अभ्यासाचा हवाला दिलेला नाही. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना झालेली कोरोनाची लागण पाहता स्वामींचा दावा गंभीरतेने घेण्याची गरज आहे.
Corona Third Wave: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेने (Corona second wave) हाहाकार माजविला आहे. केंद्र सरकारने नुकतीच तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तविली आहे. याच वेळी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर (Corona third wave) एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांच्या दाव्यानुसार देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यामध्ये लहान मुले, बालके (Childrens) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतील, यासाठी आजच काळजी घ्यावी लागेल. स्वामी यांनी ट्विट करून हा दावा केला आहे. (corona Virus third wave will targets children unless strict precautions now are taken.)
सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. एवढ्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर राहिलेल्या स्वामी यांनी कोरोना तिसऱ्या लाटेच्या दाव्यावर कोणत्याही अभ्यासाचा हवाला दिलेला नाही. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना झालेली कोरोनाची लागण पाहता स्वामींचा दावा गंभीरतेने घेण्याची गरज आहे.
India will survive Coronavirus Pandemic as it did Islamic invaders and British Imperialists. We could face one more wave that targets children unless strict precautions now are taken. Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless
— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021
मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते. अनेकदा ते पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत. यामुळे कोणत्याही हवाल्याशिवाय स्वामींनी ही गोष्ट सांगणे म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारखे आहे. आधीच लोक दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे भीतीच्या छायेखाली आहेत. स्वामींच्या या दाव्याच्या काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने हिवाळ्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता जाहीर केली. मात्र, या लाटेत कोण कोण प्रभावित होतील हे सांगितले नाही.
I had already warned two days ago that the third Coronavirus wave will target young children. We need a serious Crisis Management Team now instead of PMO psychos to monitor and strategize the response. Today the NITI Aayog Member confirms the danger of the third wave
— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021
केंद्राच्या सल्लागारांनी काय सांगितले?
देशात कोरोनाच्या दुसºया लाटेनंतर तिसरी लाट येणे अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटा येणार असून त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज झाले पाहिजे.
के. विजयराघवन यांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी लसी तयार करणेही आवश्यक आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे संसर्गात तसेच रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचा देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनाचे निकष पाळून कमी वेळेत औषधे, लसी तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत.