CoronaVirus News: कोरोना संकटात सर्वासामान्यांना मोठा दिलासा; पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटरचे दर घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:37 PM2021-07-14T21:37:59+5:302021-07-14T21:39:47+5:30

२० जुलैपासून नवे दर लागू होणार; वितरकांचं मार्जिन निश्चित

coronavirus third wave pulse oximeter blood pressure monitor medical equipment price will be reduced | CoronaVirus News: कोरोना संकटात सर्वासामान्यांना मोठा दिलासा; पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटरचे दर घटणार

CoronaVirus News: कोरोना संकटात सर्वासामान्यांना मोठा दिलासा; पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटरचे दर घटणार

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच राज्य आणि केंद्राच्या यंत्रणा सतर्क आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी तिसऱ्या लाटेचा इशारा देत असताना औषध दर नियामकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, नेब्युलायझर, डिजिटल थर्मामीटर, ग्लुकोमीटरसारख्या वैद्यकीय उपकरणांच्या किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय नियामकांकडून घेण्यात आला आहे.

वैद्यकीय उपकरणांवर वितरकांना मिळत असलेलं मार्जिन ७० टक्कयांपर्यंत निश्चित करण्याचा निर्णय नियामकांनी घेतला आहे. तशी माहिती एनपीपीएनं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. या सर्व उपकरणांची सुधारित किंमत २० जुलै २०२१ पासून लागू होईल. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत त्याची अंमलबाजावणी करण्यात येईल. सध्याच्या घडीला पाचही उपकरणांवरील मार्जिन ३ टक्के ७०९ टक्के इतकं आहे.

कोरोनाची दुसरी लाट आली असताना देशात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवला. बेसिक टेस्टिंग उपकरणांची मागणीदेखील अचानक वाढली. त्यामुळे औषधांच्या दुकानात त्यांची अव्वाच्या सव्वा किमतीला विक्री झाली. ऑक्सिजनपासून बेसिक टेस्टिंग उपकरणांची कमतरता जाणवू लागल्यानं देशात भयावह परिस्थिती पाहायला मिळाली. अनेकांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. औषधांच्या किमती बेसुमार वाढल्याचा फटका सामान्यांना बसला.

गेल्याच महिन्यात केंद्र सरकारनं कोरोना उपचाराशी संबंधित १८ उत्पादनांवरील कर कमी केले. यामध्ये हँड सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, टेस्ट किट, रुग्णवाहिका, थर्मामीटरचा समावेश होता. नवे दर २० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू असतील. याशिवाय कोरोनावरील उपचारात उपयोगी असलेल्या टोसिलिजुमॅब आणि ब्लॅक फंगसवरील उपचारात प्रभावी असलेल्या एम्फोटेरेसिन बीवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून ० टक्क्यांवर आणण्यात आला.

Web Title: coronavirus third wave pulse oximeter blood pressure monitor medical equipment price will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.