Delhi on the Way Of Lockdown: सर्व हॉटेल, खासगी ऑफिस बंद करण्याचे आदेश; दिल्ली लॉकडाऊनच्या दिशेने?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:43 AM2022-01-11T11:43:00+5:302022-01-11T11:47:25+5:30
Delhi on the Way Of Lockdown: कोरोना सोबत जगावे लागेल असे पहिला लॉकडाऊन उठविताना म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीची पावले तिसऱ्या लाटेमध्ये हळूहळू लॉकडाऊनकडे पडू लागली आहेत. थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतू त्याच्या तासभर आधीच दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंटने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली कोरोना रुग्णसंख्या अचानक काही हजारांवर गेल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना सोबत जगावे लागेल असे पहिला लॉकडाऊन उठविताना म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीची पावले तिसऱ्या लाटेमध्ये हळूहळू लॉकडाऊनकडे पडू लागली आहेत. थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतू त्याच्या तासभर आधीच दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंटने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला ही कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने ही कार्यालयेच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Private offices in Delhi shall be closed, barring the ones in the exempted category; work from home shall be followed: DDMA pic.twitter.com/yPkwDR8t3o
— ANI (@ANI) January 11, 2022
यानंतर दिल्लीमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त घरपोच सेवा सुरु राहणार आहे. पत्रकार, सरकारी कार्यालयांतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी लोकांना त्यांच्या आयडी कार्डवर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या अत्यावश्यक सेवांशी संबंधीत कार्यालये सुरु ठेवण्यास परवानगी आहे.
देशात आणि राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भारतात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे १,६८,०६३ नवीन रुग्ण आढळले आहेत.