coronavirus: तिरूपती देवस्थानकडे पगार देण्यासाठी रोकड नाही, देणग्यांमध्ये ४०० कोटींची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:23 AM2020-05-12T00:23:16+5:302020-05-12T00:24:30+5:30
४५ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये टीटीडीबीला ४०० कोटी रुपये महसुलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाची पूर्तता करण्यास अडचणी येत आहे. एप्रिल महिन्याच्या खर्च ३०० कोटी अपेक्षित आहे.
हैदराबाद - जगातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरूमाला तिरुपती देवस्थान बोर्डाकडे (टीटीडीबी) आपल्या ७०० कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी रोख रक्कम नसल्याची माहिती बोर्डाच्या उच्चस्तरीय अधिका-याने दिली आहे.
४५ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये टीटीडीबीला ४०० कोटी रुपये महसुलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाची पूर्तता करण्यास अडचणी येत आहे. एप्रिल महिन्याच्या खर्च ३०० कोटी अपेक्षित आहे.
टीटीडीबीकडे १४ हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी असून, ८ टन सोन्याचे साठे असून, त्यातून खर्च करण्याची बोर्डाची इच्छा नाही. आम्ही या साठ्याला हात न लावता संकट सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोर्डाचे अधिकारी म्हणाले. टीटीडीबीचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी प्रसिद्धिमाध्यमांशी चर्चेदरम्यान म्हणाले, बोर्डाचा वार्षिक खर्च २,५०० कोटी रुपये असून, त्यात कर्मचाºयांचे वेतन १,३८५ कोटी आणि इतर खर्च आहेत. यामध्ये बोर्डातर्फे संचालित रुग्णालये आणि धर्मादाय संस्थांचा समावेश आहे.