Coronavirus: देशामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ लाखांवर; २४ तासांत ६७,१५१ नवे रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:26 AM2020-08-27T01:26:48+5:302020-08-27T07:05:25+5:30

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२,३४,४७४ असून २४,६७,७५८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

Coronavirus: The total number of patients india over 32 lakh; 67,151 new patients in a day | Coronavirus: देशामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ लाखांवर; २४ तासांत ६७,१५१ नवे रुग्ण आढळले

Coronavirus: देशामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ लाखांवर; २४ तासांत ६७,१५१ नवे रुग्ण आढळले

Next

नवी दिल्ली : देशात बुधवारी कोरोनाचे ६७,१५१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७६.३० टक्के असून, अशा लोकांची संख्या २४ लाख ६७ हजारांपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे आणखी १,०५९ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा ५९,४४९ वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२,३४,४७४ असून २४,६७,७५८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात ७,०७,२६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २१.८७ टक्के इतके आहे. दररोज पार पडणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ, त्यामुळे रुग्ण सापडण्याचे वाढलेले प्रमाण व वेळेत होणारे उपचार या तीनही गोष्टींमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.८४ टक्के इतका कमी राखण्यात यश आले आहे.

कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ६,७२१, कर्नाटकमध्ये ४,९५८, दिल्लीमध्ये ४,३३०, आंध्र प्रदेशमध्ये ३,४६०, उत्तर प्रदेशमध्ये ३,०५९, गुजरातमध्ये २९२८, पश्चिम बंगालमध्ये २,९०९, मध्यप्रदेशमध्ये १,२६५, पंजाबमध्ये १,१७८, राजस्थानात ९८०, तेलंगणामध्ये ७८०, जम्मू-काश्मीरमध्ये ६३८, हरयाणामध्ये ६२३ इतकी आहे. त्याशिवाय इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यातील ७० टक्के लोक एकाहून अधिक व्याधीने ग्रस्त होते.

बरे होणाऱ्यांचे प्रमाण 76 टक्क्यांवर
59,449 मृत्यू
67,151 नवे रुग्ण

३ कोटी ७६ लाखांहून अधिक चाचण्या
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात कोरोनाच्या ८,२३,९९२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा चाचण्यांची एकूण संख्या ३,७६,५१,५१२ इतकी झाली आहे.

Web Title: Coronavirus: The total number of patients india over 32 lakh; 67,151 new patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.