Coronavirus:  कोरोनावर शास्त्रीय नव्हे अंधश्रद्धेचे होताहेत उपचार; कुठे मंदिरात अनुष्ठान तर कुठे विशेष हवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:06 AM2021-05-20T10:06:29+5:302021-05-20T10:06:53+5:30

आगर माळवा जिल्हा मुख्यालयाच्या बाह्य भागातील बैजनाथ निपानिया गावात गेल्या दोन आठवड्यांत २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus treatment is not classical; Where rituals are performed in the temple and where special havans are performed | Coronavirus:  कोरोनावर शास्त्रीय नव्हे अंधश्रद्धेचे होताहेत उपचार; कुठे मंदिरात अनुष्ठान तर कुठे विशेष हवन

Coronavirus:  कोरोनावर शास्त्रीय नव्हे अंधश्रद्धेचे होताहेत उपचार; कुठे मंदिरात अनुष्ठान तर कुठे विशेष हवन

Next

आगर माळवा (मध्य प्रदेश) : कोरोनामुळे देशात ग्रामीण भागांतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सरकारी आकडेवारीनुसार आगर माळवा जिल्ह्यात आतापर्यंत २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, ग्रामस्थ उपचार न घेता जादूटोण्याला जवळ करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांत मृत्यू प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यातून ६१३ अर्ज आले आहेत. या अर्जांतील बहुतेक अर्जदार हे गावातील असून ते त्यांच्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकले नाहीत. कोरोनाबाबत आगर माळवातील गावांची परिस्थिती माहीत करून घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ग्रामस्थ कोरोना चाचणी न करता अंधश्रद्धेची मदत घेत असल्याचे दिसले.

आगर माळवा जिल्हा मुख्यालयाच्या बाह्य भागातील बैजनाथ निपानिया गावात गेल्या दोन आठवड्यांत २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील लोकांचे म्हणणे  निश्चितपणे याचे कारण कोरोना नव्हता, असे आहे. ग्रामस्थ याला अज्ञात कारणांनी मृत्यू, असे सांगतात. त्यांचे म्हणणे असे की, सोमवारी एक अनुष्ठान केले. तेथे प्रत्येक व्यक्तीला गावाच्या प्रवेशद्वारावरील एका काल्पनिक दारातून जावे लागते. या काल्पनिक दारावर दोन लोकांकडून त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडले गेलेे आणि गावातील मंदिरात केल्या गेलेल्या एका विशेष पूजेनंतर पाणी आणले गेले.  गावात राहणारे नारायण सिंह सांगतात की, “हे एक विशेष अनुष्ठान असून खूप जुन्या काळापासून केले जात आहे. जनावरे आणि मनुष्य महामारीत सापडले असल्यामुळे हे अनुष्ठान आम्हाला कोरोनातून वाचवेल.”

गावातील घरे रिकामी
फक्त दोन किलोमीटर दूर असलेल्या आवर गावात चार हजारपेक्षा जास्त लोकांनी आपली घरे रिकामी केली आहेत. स्थानिक मंदिरात काही मोजक्या लोकांकडून विशेष हवन केले जात आहे. या गावातही गेल्या दोन आठवड्यांत २० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असला तरी ग्रामस्थांचे म्हणणे असे की, मृत्यूचे कारण कोरोना नव्हे, दुसरेच काही होते.

Web Title: Coronavirus treatment is not classical; Where rituals are performed in the temple and where special havans are performed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.