coronavirus: केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला कोरोना वॉरियर मुलीचा फोटो, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:31 AM2021-04-27T10:31:03+5:302021-04-27T10:35:02+5:30

coronavirus in India : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीतही डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य सेवक कोरोना वॉरियर म्हणून निष्ठेने काम करत आहेत.

coronavirus: Union minister Mansukh Mandaviya shares photo of Corona Warrior daughter, says waited long for this day | coronavirus: केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला कोरोना वॉरियर मुलीचा फोटो, म्हणाले...

coronavirus: केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला कोरोना वॉरियर मुलीचा फोटो, म्हणाले...

Next
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी कोरोनाकाळात कोरोना वॉरियर म्हणून लढत असलेल्या आपल्या मुलीचा एक फोटो केला शेअरम्हणाले, माझी मुलगी माझा अभिमान, मी तुला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप वाट पाहिलीदेशाला तुझ्या सेवेची गरज आहे आणि मला विश्वास आहे की, तू या परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करून दाखवशील

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus in India) झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकारसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, अशा परिस्थितीतही डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य सेवक कोरोना वॉरियर म्हणून निष्ठेने काम करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनीही कोरोनाकाळात कोरोना वॉरियर म्हणून लढत असलेल्या आपल्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. मुलीला कोरोना वॉरियर म्हणून पाहण्यासाठी खूप वाट पाहावी लागली, असे ते म्हणाले. (Union minister Mansukh Mandaviya shares photo of Corona Warrior daughter, says waited long for this day)

केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी मुलगी दिशा हिचा एक फोटो मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात ते लिहितात की, माझी मुलगी माझा अभिमान, मी तुला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप वाट पाहिली. इंटर्न म्हणून तू अशा परिस्थिती कर्तव्य निभावत आहेस हे पाहून उर अभिमानाने भरून आला, देशाला तुझ्या सेवेची गरज आहे आणि मला विश्वास आहे की, तू या परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करून दाखवशील. 

मंडाविया यांनी मुलीचे कौतुक करणारे ट्विट केल्यानंचर ट्विटरवरी अन्य युझर्सकडूनही दिशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सद्यस्थिीत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या वर पोहोचलेली आहे. तसेच देशाती अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. 

यापूर्वी केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ऑक्सिजनच्या वाहतुकीबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. केंद्र सरकारने सर्व प्रमुख बंदरांवर ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनशी संबंधित उपकरणे घेऊन येणाऱ्या सर्व जहाजांवरील शुक्ल माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय सध्या कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी २५ नव्या साइट्सला मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होत.  

Web Title: coronavirus: Union minister Mansukh Mandaviya shares photo of Corona Warrior daughter, says waited long for this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.