CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:38 PM2021-08-30T12:38:25+5:302021-08-30T12:39:29+5:30

कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशभरात एकूण 3 कोटी 27 लाख 37 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 4 लाख 38 हजार 210 लोकांचा मृत्यू झाला आहे.

coronavirus update 30 august 2021 today new corona cases deaths recovery in India | CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती

CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती

Next


नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढायला सुरुवात झाली आहे. रविवारी जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण भारतात आढळून आले. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने ताजी आकडेवारी जाहीर केली. यानुसार, गेल्या 24 तासांत देशात 42,909 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 380 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत 34,763 लोकांनी कोरोनावर मात केली, म्हणजेच काल 7766 सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. (coronavirus update 30 august 2021 today new corona cases deaths recovery in India)

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, भारतात काल सर्वाधिक कोरोना रुग्ण समोर आले. याशिवाय, अमेरिकेत 37262, इंग्लंडमध्ये 33196, इराणमध्ये 31516, जपानमध्ये 22748 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच काल रशिया, मॅक्सिको, इराण आणि इंडोनेशियामध्ये भारतापेक्षा कमी मृत्यूची नोंद केली गेली आहे.

कोरोनाचा नवीन AY.12 व्हेरिएंट? शास्त्रज्ञांची चिंता वाढली 

अशी आहे भारताची स्थिती -
कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशभरात एकूण 3 कोटी 27 लाख 37 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 4 लाख 38 हजार 210 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 23 हजार लोक कोरोनातून बरेही झाले आहेत. सध्या देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

एकूण कोरोना रुग्णांची संख्या - 3 कोटी 27 लाख 37 हजार 939
एकूण डिस्चार्ज - 3 कोटी 19 लाख 23 हजार 405
एकूण सक्रिय रुग्ण - 3 लाख 76 हजार 324
एकूण मृत्यू - 4 लाख 38 हजार 210
एकूण लसीकरण - 63 कोटी 43 लाख 81 हजार डोस देण्यात आले

बापरे! डोळे आणि फुफ्फुसांनंतर आता कोरोना कानावर करतोय 'अटॅक'; ऐकण्याची क्षमता होतेय कमी

भारतातील कोरोना रुग्ण वाढण्याचे मुख्य कारण केरळ -
केरळमध्ये सलग चार दिवस तब्बल 30 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित समोर आल्यानंतर, रविवारी 29,836 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. यानंतर केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 40 लाख 7 हजार 408 वर पोहोचली आहे. तर गेल्या एका दिवसात कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढू 20,541 वर पोहोचला आहे.
 

Web Title: coronavirus update 30 august 2021 today new corona cases deaths recovery in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.