Coronavirus Update Cases In India : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:36 AM2022-01-15T10:36:10+5:302022-01-15T10:37:10+5:30
Coronavirus Update Cases In India : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी झाली रुग्णवाढ. लाखांवर रुग्णांची कोरोनावर मात.
Coronavirus Update Cases In India : कोरोनाबाधित (Coronavirus Patients) रुग्णांच्या संख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा तब्बल २ लाखांच्या वर नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत देशात एकूण २ लाख ६८ हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता वाढून ३ कोटी ६८ लाख ५० हजार ९६२ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत देशात ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून आथा १४ लाख १७ हजार ८२० इतकी झाली आहे. तर चोवीस तासांमध्ये १ लाख २२ हजार ६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा १६.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे देशात ६ हजारांपेक्षा अधिक ओमायक्रॉन (Omicron Variant) चे रुग्णही सापडले आहेत. शुक्रवारी देशात निरनिराळ्या राज्यात मिळून ६ हजार ४१ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले.
India reports 2,68,833 fresh COVID cases (4,631 more than yesterday) and 1,22,684 recoveries in the last 24 hours
— ANI (@ANI) January 15, 2022
Active case: 14,17,820
Daily positivity rate: 16.66%
Confirmed cases of Omicron: 6,041 pic.twitter.com/V8Qlx83eis
The country recorded 402 COVID fatalities in the last 24 hours, taking the total death toll to 4,85,752: Union Health Ministry
As per the ministry, over 1,56,02,51,117 crore COVID vaccine doses have been administered so far— ANI (@ANI) January 15, 2022
देशात गेल्या चोवीस तासांत ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत ५.०१ टक्क्यांची वाढ दिसून आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या रिकव्हरी रेट हा ९४.८३ वर आला आहे. तर डेली पॉझिटिव्हीटी रेट हा १६.६६ वर पोहोचला असून यापूर्ववी तो १४.७ टक्के होता. तर वीकली पॉझिटिव्हीटी रेट वाढून १२.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात १५६.०२ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.