CoronaVirus Update: राज्यात पुन्हा मास्क परतणार? कोरोना वाढतोय, पंचसुत्रीचे पालन करा; केंद्राचे महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:43 PM2022-04-19T23:43:22+5:302022-04-19T23:45:29+5:30
दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे.
कोरोनाच्या सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. आता पुन्हा दिल्लीसह पाच राज्यांत कोरोना वाढू लागला असून केंद्र सरकारकडून य़ा राज्यांना कोरोनाच्या पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलावीत, असे म्हटले आहे. यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यास सांगितले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. कोणत्याही स्तरावर काळजी घेण्यात चूक झाली तर आजवर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण कमी होईल.
#COVID19 | Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Haryana, Uttar Pradesh, Delhi, Maharashtra, and Mizoram on the increasing positivity rate and cases pic.twitter.com/vHqZUCObi4
— ANI (@ANI) April 19, 2022
गेल्या दोन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली होती. परंतू आता पुन्हा कोरोनाचे दिवसाला हजारावर रुग्ण सापडू लागले आहेत. साप्ताहिक संक्रमण एक टक्क्यापेक्षा कमी आहे, असे ते म्हणाले.