CoronaVirusupdate : हरिद्वारमध्ये कोरोनाचं तांडव, दर सव्वा मिनिटाला एक संक्रमित!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 06:00 PM2021-04-24T18:00:15+5:302021-04-24T18:03:10+5:30
येथे कोरोना परिस्थिती भयावह असतानाही, वैष्णव वैरागी अखाडा अखेरच्या कुंभ स्नानासाठी शाही थाटात आणि अंदाजात हर की पैडीला जाण्याच्या तयारीत आहे.
हरिद्वार - कुंभनगरी हरिद्वार येथे कोरोना व्हायरसने कुंभ महापर्वाला ग्रहण लावले आहे. मात्र, अद्यापही चैत्र पौर्णिमेच्या स्नानासाठी येथेच असलेल्या संतांच्या आखाड्यात कोरोना संक्रमण हाताबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत हरिद्वार आणि ऋषिकेशसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे 1175 कोरोनाबाधित समोर आले आहेत. (CoronaVirus update Uttarakhand kumbh haridwar many positive case)
निरंजनी अखाड्याच्या महामंडलेश्वरांचे दिल्लीत निधन झाल्याशिवाय, हरिद्वारमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात आरोग्य विभागाची व्यवस्था कमी पडत आहे. यामुळे शहरात अराजकाची स्थिती आहे. कोणत्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा, हेही लोकांना कळेनासे झाले आहे.
हरिद्वारमध्ये कोरोना हाताबाहेर -
येथे कोरोना परिस्थिती भयावह असतानाही, वैष्णव वैरागी अखाडा अखेरच्या कुंभ स्नानासाठी शाही थाटात आणि अंदाजात हर की पैडीला जाण्याच्या तयारीत आहे. अधिकांश शैव अखाड्यांनी आपापल्या पातळ्यांवर कुंभ संपल्याची घोषणाही केली आहे. तसेच शैव साधूंच्या दाहाही आखाड्यांसोबत दोन उदासीन अखाडे आणि शीख साधूंच्या निर्मल अखाड्यांनी तीन शाही स्नान केले आहे. मात्र, 14 एप्रिलला मेष संक्रांतीनिमित्त झालेल्या कुंभमेळ्याच्या तिसऱ्या शाही स्नान होताना कोरोनाचा, असा स्फोट झाला आहे, की परिस्थिती अद्यापही हातात आलेली नाही. येथो कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.
दर सव्वा मिनिटाला एक कोरोना रुग्ण -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीएचआयएलमध्ये 48, शिवालिक नगरात 13, कनखलमध्ये 10, नवोदय स्कूलमध्ये 8, आयआयटी रुडकीमध्ये चार, जूना व निरंजनी अखाड्यात 11 संक्रमित आढळून आले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याभरात 24 तासांत 1175 संक्रमित आढळून आले आहेत. याचा विचार करता दर सव्वा मिनिटाला एक करोना रुग्ण आढळत आहे. सातत्याने येथील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. तसेच यामुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण येत आहे.
CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती
उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर, 49 लोकांनी आपला जीवही गमावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत आता राज्य सरकारच्या वतीने येथे कडक नियमावली जारी केली आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णसंख्येत कमी येताना दिसत नाही.