CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ८३३ कोरोनाबाधितांची नोंद; २७८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:15 PM2021-10-06T12:15:27+5:302021-10-06T12:15:47+5:30
महत्त्वाची बाब म्हणजे, २०३ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात १८,८३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात २,४६,६८७ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, २०३ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
COVID19 | India reports 18,833 new cases in the last 24 hours; Active caseload stands at 2,46,687; lowest in 203 days, as per Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/DLPR1hh7T3
— ANI (@ANI) October 6, 2021
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात मंगळवारी ४ हजार ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन २ लाख ४६ हजार ६८७ वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी ३८ लाख ७१ हजार ८८१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख ४९ हजार ५३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३१ लाख ७५ हजार ६६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.