CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या २४ हजार ३५४ कोरोनाबाधितांची नोंद; २३४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 11:47 AM2021-10-02T11:47:19+5:302021-10-02T11:47:47+5:30
आतापर्यंत देशभरात २,७३,८८९ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २४,३५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात २,७३,८८९ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
COVID19 | India reports 24,354 new cases in the last 24 hours; Active caseload at 2,73,889; lowest in 197 days: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/6t3MvQvppn
— ANI (@ANI) October 2, 2021
केरळमध्ये शुक्रवारी १३ हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ९५ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांनंतर केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळत आहे. देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून शुक्रवारी कोरोनाचे ६९ लाख ३३ हजार ८३८ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण ८९ कोटी ७४ लाख ८१ हजार ५५४ इतके डोस देण्यात आले आहेत.
#COVID19 | Of 24,354 new cases reported in India in the last 24 hours, Kerala recorded 13,834 new cases and 95 deaths yesterday
— ANI (@ANI) October 2, 2021
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी ३१०५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल ३ हजार १६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७४ हजार ८९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.