CoronaVirus Updates: देशात नव्या २८ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:05 AM2021-09-26T11:05:04+5:302021-09-26T11:05:24+5:30
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३६ लाख ५२ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २८,३२६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २६० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २६,०३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२९,०२,३५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३६ लाख ५२ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ९१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत ३ कोटी २९ लाख २ हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. एकूण ३ लाख ३ हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
India reports 28,326 new COVID cases, 26,032 recoveries, and 260 deaths in the past 24 hours.
— ANI (@ANI) September 26, 2021
Active cases: 3,03,476
Total recoveries: 3,29,02,351
Death toll: 4,46,918
Vaccination: 85,60,81,527 (68,42,786 in the last 24 hours) pic.twitter.com/2g3YsGlXnS
राज्यात शनिवारी ३,७२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण ६३,६०,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३७,९८४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात ३,२७६ रुग्णांचे निदान झाले असून, ५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.२८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ३८ हजार ८३४ झाली आहे.