CoronaVirus Updates: देशात नव्या ३० हजार २५६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 11:22 AM2021-09-20T11:22:23+5:302021-09-20T11:22:32+5:30
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३४ लाख ७८ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात ३०,२५६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १८ हजार १८१ वर पोहोचली. तर गेल्या २४ तासांत ४३,९३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२७,१५,१०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३४ लाख ७८ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ लाख ४५ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत ३ कोटी २७ लाख १५ हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण ३ लाख १८ हजार १८१ रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
India reports 30,256 fresh cases of #COVID19, 43,938 recoveries, and 295 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) September 20, 2021
Total cases: 33,478,419
Total Active cases: 3,18,181
Total Recoveries: 3,27,15,105
Total Death toll: 4,45,133
Total vaccination : 80,85,68,144 (37,78,296 in last 24 hours) pic.twitter.com/MTf1Qrrxwh
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४१३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ३९१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ८ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात झालेल्या ४९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ३६ हजार ८८७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के इतके झाले आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७० लाख २८ हजार ४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख २१ हजार ९१५ (११.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ५६१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ७५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.