CoronaVirus Updates: देशात नव्या ३५ हजार ६६२ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:09 AM2021-09-18T11:09:43+5:302021-09-18T11:10:09+5:30
आतापर्यंत एकूण ३,२६,३२,२२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात ३५,६६२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४० हजार ६३९ वर पोहोचली. तर गेल्या २४ तासांत ३३,७९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२६,३२,२२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
India reports 35,662 new #COVID19 cases and 33,798 recoveries in the last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) September 18, 2021
Active cases: 3,40,639
Total recoveries: 3,26,32,222
India administered the highest-ever single day vaccinations with 2.5 crore doses given in the last 24 hours pic.twitter.com/RUKbREQYH9
दरम्यान, राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ हजार ४१० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, ३ हजार ५८६ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६३, २४, ७२० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१५,१११ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८३८९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६७,०९,१२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,१५,१११ (११.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८१,०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १,८१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४८,४५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.