Coronavirus Updates: सलग ४३ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक; संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 06:59 AM2021-06-26T06:59:03+5:302021-06-26T06:59:11+5:30
१३०० मृत्यू; संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा कमी
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ५१ हजार नवे कोरोना रुग्ण सापडले असून ६४ हजार जण बरे झाले आहेत, तर १३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग ४३ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. संसर्ग दरही पाच टक्क्यांच्या खाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी १ लाख ३४ हजार ४४५ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७ जण बरे झाले तर मृतांची आकडेवारी ३ लाख ९३ हजार ३१० झाली आहे. ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीचे ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
एकूण कोरोना रुग्णांपैकी ९६.६६ टक्के जण बरे झाले असून त्यात वाढ होत आहे. दर आठवड्याचा व दर दिवसाचा संसर्ग दर अनुक्रमे ३ टक्के व २.९८ टक्के आहे. दररोजचा संसर्ग दर सलग १८ व्या दिवशी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाच्या ३९.९५ कोटी चाचण्या आजवर करण्यात आल्या. राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या दीड कोटी कोरोना लसी शिल्लक आहेत, असे केंद्र सरकारने सांगितले.
जगात १८ कोटी कोरोना रुग्ण
जगभरातील १८ कोटी ७ लाख कोरोना रुग्णांपैकी १६ कोटी ५४ लाख जण बरे झाले. १ कोटी १४ लाख लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये ३ कोटी ४४ लाख रुग्णांपैकी २ कोटी ८८ लाख लोक कोरोनामुक्त झाले. ४९ लाख ७४ हजार जणांवर उपचार सुरू आहेत व ६ लाख १८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.