Coronavirus : तुमचे आदरणीय पंतप्रधान खूपच...; 'त्या' परदेशी महिलेनं घातली पोलिसांशी हुज्जत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 11:31 AM2020-04-13T11:31:55+5:302020-04-13T11:35:59+5:30
काही लोक मुद्दामहून लॉकडाऊनचं उल्लंघन करत घराबाहेर पडत आहेत. अशांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईसुद्धा केली जात आहे.
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, पोलीससुद्धा कडक पहारा देत आहेत. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. परंतु काही लोक मुद्दामहून लॉकडाऊनचं उल्लंघन करत घराबाहेर पडत आहेत. अशांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईसुद्धा केली जात आहे. शनिवारी दिल्लीतल्या वसंत विहार भागात एक परदेशी महिला सायकल चालवताना पकडली गेली.
पोलिसांनी रस्त्यावर सायकल चालवत असताना तिला पकडलं. त्यानंतर तिनं पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे मास्क घालण्याची सक्ती केली असतानाही ही महिला मास्क न घालता मोकळ्या रस्त्यांवर सायकल चालवत होती. ही महिला पोलिसांशी हुज्जत घालत असलेला व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
वसंत विहारच्या पश्चिम रस्त्यावरील परदेशी महिलेला मास्क किंवा हातमोजे न घालता सायकलवरून फिरत असताना तिला पोलिसांनी रोखले. तुमचे आदरणीय पंतप्रधान खूपच आदरणीय म्हणत तिनं पोलिसांशीच वाद घालण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्यानं तिला मास्क आणि हातमोजे का नाही घातले, असं विचारलं असता तिनं त्यांच्याशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर तिनं नाव विचारलं आणि तिथून निघून गेली. ही महिला ऊरुग्वेची रहिवासी असल्याचं आता समोर आलं आहे.A woman from Uruguay refuses to follow lockdown and goes around cycling. Gets into argument with cops in Vasant Vihar in Delhi when stopped. Identified as Ana Valentina Obispo. pic.twitter.com/BKK8yPKq8O
— Raj Shekhar Jha (@rajshekharTOI) April 12, 2020
A woman from Uruguay was stopped by Police yesterday at Paschimi Marg in Vasant Vihar as she was cycling without wearing a pair of gloves or mask. She started arguing with Police and noted down the name of Police officer who asked her to wear gloves and mask: Delhi Police pic.twitter.com/GV45XD9X7r
— ANI (@ANI) April 12, 2020