CoronaVirus: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा '3T' फॉर्म्यूला हिट; उत्तर प्रदेशात असा सुरू आहे कोरोनाचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:11 AM2021-05-23T09:11:21+5:302021-05-23T09:12:27+5:30
राज्यात कोरोना टेस्ट वाढल्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. उत्तर प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखहून खाली आली आहे. उत्तर प्रदेशात 21 दिवसांच्या आत 2.15 लाख केसेस घटल्या आहेत.
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा थ्री टी (टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट) फॉर्म्यूला हिट होताना दिसत आहे. या फॉर्म्यूल्यांतर्गत संपूर्ण देशात सर्वाधिक कोरना टेस्ट उत्तर प्रदेशात झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 4.65 कोटी टेस्ट झाल्या आहेत. याच बरोबर कोरोना टेस्टिंगमध्येही उत्तर प्रदेशने नवा विक्रम तयार केला आहे. एका दिवसात सर्वाधिक 3.07 लाख विक्रमी टेस्ट करणारे ते पहिले राज्य ठरले आहे.
याच बरोबर राज्यात कोरोना टेस्ट वाढल्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. उत्तर प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखहून खाली आली आहे. उत्तर प्रदेशात 21 दिवसांच्या आत 2.15 लाख केसेस घटल्या आहेत.
जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती
तत्पूर्वी, योगी आदित्यनाथ म्हणाले होते, कोरोना विरोधातील सामूहिक लढ्यामुळे राज्य सक्रिय रुग्ण संख्या कमी करण्यात यशस्वी ठरले आहे. पत्रकारांशी बोलताना योगी म्हणाले होते, एकत्रितपणे कोरोनाचा सामना करत असल्याने 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान उत्तर प्रदेशात, जेथे रोज एक लाखहून अधिक नवे रुग्ण आढळण्याची शक्यता होती, ते कमी करण्यात यश आले आहे. राज्यात पंतप्रधानांचे कुशल मार्गदर्शन, केंद्र सरकारची मदत, लोकप्रतिनिधींची सतर्कता आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमच्या सहकार्याने सुरू असलेल्या अभियानांतर्गत कोरोनाचा कंबर कसून सामना केला आहे.
योगी म्हणाले, ‘‘30 एप्रिलला राज्यात तीन लाख 10 हजार लोक उपचार घेत होते. मात्र, ही संख्या शुक्रवारी 1,06,276 वर आली. 30 एप्रिलच्या तुलनेत हा आकडा 68 टक्क्यांनी कमी झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भागांत परीक्षण आणि इतर वैद्यकीय सुविधा, यांमुळे नवी रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यांनी दावा केला, की चार कोटी 62 लाख हून अधिक कोरोना नमुण्यांची तपासणी करून उत्तर प्रदेश कोरोना टेस्ट करणाऱ्या राज्यांत पहिल्या स्थानावर आहे.’’