CoronaVirus News: उत्तर प्रदेशने केला विक्रम; दिवसाला १ लाख चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:05 AM2020-08-12T04:05:26+5:302020-08-12T04:05:45+5:30
देशात रोज १० लाख चाचण्यांचे लक्ष्य; महाराष्ट्रात रुग्णवाढीचा वेग खाली
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात दररोज एक लाख कोरोना विषाणूच्या चाचण्या घेऊन विक्रम स्थापन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात रोज दहा लाख अशा चाचण्या झाल्या पाहिजेत, असे लक्ष्य ठरवले आहे.
सोमवारपर्यंत ६.९८ लाख चाचण्या केल्या गेल्या होत्या. एकट्या उत्तर प्रदेशने १.२० लाख चाचण्या केल्या. महाराष्ट्राने ७५,६०० तर तमिळनाडूने ७०,२०० चाचण्या केल्या होत्या. आतापर्यंत उत्तर प्रदेशने ३३ लाखांपेक्षा जास्त चाचण्या करून पहिले स्थान मिळवले आहे. देशात सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य असूनही उत्तर प्रदेश बिहारसारखे चाचण्यांत मागे पडले होते. परंतु, ठाम निश्चय असलेल्या आदित्यनाथ यांनी एक जुलैपासून अवघ्या ४० दिवसांत चाचण्यांचा वेग वाढवला.
एक जुलै रोजी उत्तर प्रदेशने ७.०७ लाख चाचण्या केल्या होत्या. तेव्हा तो महाराष्ट्र (९.४६ लाख) आणि तमिळनाडू (११.४० लाख) व इतर तीन राज्यांपेक्षा मागे होता. परंतु, सोमवारी त्याने ३२ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडून मंगळवारी ३३ लाखांची पायरी गाठली. वस्तुस्थिती अशी की, उत्तर प्रदेशची ४० दिवसांतील चाचण्यांची टक्केवारी होती ४०० टक्के.
अर्थात महाराष्ट्रानेही एक जुलै रोजी नऊ लाख असलेली चाचण्यांची संख्या १० आॅगस्ट रोजी २८ लाखांपर्यंत नेली. महाराष्ट्र आणि तमिळनाडूत चाचण्यांची टक्केवारी प्रत्येकी ३०० टक्क्यांनी वाढली. तथापि, नितीश कुमार यांचा बिहार यात फक्त १० लाख चाचण्या करून मागेच
राहिला.
रुग्णांचा दरही घटला
उत्तर प्रदेशचा उल्हासित करणारा आणखी एक मुद्दा असा की, कोविड-१९ चे रुग्ण असण्याचा दर ३.९ टक्केच आहे. हा दर कमालीचा खाली आहे.
भारताचा रुग्ण वाढीचा वेग हा १० आॅगस्ट रोजी ९ टक्के होता. महाराष्ट्रातही कोरोना पॉझिटिव्ह निघण्याचा दर खाली येत आहे. गेल्या दहा दिवसांत हा दर २०.२ वरून १९.३ टक्क्यांवर आला.
दुसरे म्हणजे महाराष्ट्रात रुग्ण (किती दिवसांत) दुप्पट होण्याचा दरही सुधारला आहे. भारतात २३ दिवसांत रुग्ण दुप्पट होतात, तर महाराष्ट्रासाठी ३१ दिवस आहेत.