Coronavirus : लग्नासाठी तब्बल 850 किलोमीटर सायकलने पोहोचला नवरदेव पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:56 PM2020-04-18T12:56:37+5:302020-04-18T13:01:53+5:30
Coronavirus : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत.
गोंडा - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 450 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 13,000 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. लॉकडाऊन दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नासाठी एका नवरदेवाने तब्बल 850 किलोमीटर सायकलने प्रवास केला आहे.
नवरदेव सायकलवरून चक्क 850 किलोमीटरचा प्रवास करून आला पण लग्नाऐवजी वेगळीच गोष्ट घडली. 15 एप्रिल रोजी विवाह सोहळा पार पडणार होता. तब्बल 850 किलोमीटर सायकल चालवत नवरदेव आपल्या मित्रांसोबत लग्नासाठी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना क्वारंटाईन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानात काम करणाऱ्या एका तरुणाचं उत्तर प्रदेशातील गोंडा येथील मुलीसोबत लग्न ठरलं. पण लॉकडाऊनमुळे कोणतंच वाहन नसल्याने नवदेवाने सायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला.
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यूhttps://t.co/1IoBKnH1sA#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2020
सायकलने 850 किलोमीटरचा प्रवास करून तो लग्नासाठी पोहोचला पण पोलिसांनी त्यांना अडवलं आणि मेडिकल चेकअपसाठी पाठवलं. नवरदेव आणि त्याच्या काही मित्रांना आरोग्य विभागाने 14 दिवसांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढला असून रुग्णांची संख्या 13,000 वर गेली आहे.
Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्हhttps://t.co/2L6uzjPE0P#CoronaUpdatesInIndia#CoronaInMaharashtra#IndianNavy
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2020
काही दिवसांपूर्वी हरियाणातील एका तरुणाने मेक्सिकन तरुणीशी लग्न केलं. लॉकडाऊनमध्ये झालेल्या लग्नाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. रोहतकच्या जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात हा विवाह झाला. रोहतकमध्ये राहणाऱ्या निरंजन कश्यपची तीन वर्षांपूर्वी मेक्सिकन मुलीशी ऑनलाईन मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये त्यांचा विवाह होणार होता, मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि तो विवाह सोहळा लांबणीवर पडला होता.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : किसान योजनेसह श्रावणबाळच्या रकमेसाठी बँकांमध्ये गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू