Breaking News : १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:24 PM2021-04-19T19:24:56+5:302021-04-19T19:27:33+5:30
Coronavirus Vaccination : १ मेपासून देशात सुरू होणार तिसऱ्या टप्प्याला सुरूवात, १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस
देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
१ मे पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केलं जाणार आहे. तसंच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत. तर ५० टक्के लसी कंपन्यांना केंद्र सरकारला पुरवाव्या लागतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine pic.twitter.com/7G3WbgTDy8
— ANI (@ANI) April 19, 2021
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान आता १ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. तर काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या आपात्कालिन वापराला मंजुरी दिली होती. भारतामध्ये हैदराबादमधील डॉ. रेड्डी ही औषधनिर्माता कंपनी स्पुटनिक-V या लसीचे उत्पादन घेत आहे.
Private hospitals would have to procure their supplies of Covid-19 vaccine exclusively from the 50% supply earmarked for other than Govt of India channel: Govt of India (2/3)
— ANI (@ANI) April 19, 2021
कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर इतर देशांमध्येही सुरू आहे. त्यासाठी करारदेखील झाले असल्यानं भारतातून मोठ्या प्रमाणात लसींची निर्यात सुरू आहे. त्यामुळे देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळेच स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी देण्यात आली. स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबनं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडसोबत (आरडीआयएफ) करार केला आहे. आतापर्यंत ५९ देशांमध्ये स्पुटनिक व्ही लसीचा वापर सुरू आहे. त्यामुळे स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी देणारा भारत ६० वा देश ठरला आहे.