coronavirus: दोन टप्प्यांतील चाचण्यांनंतर येणार लस, कंपनीला आशा, समोर ठेवली १५ ऑगस्टची डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:31 AM2020-07-05T03:31:14+5:302020-07-05T03:32:10+5:30
अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील.
- हरीश गुुप्ता
नवी दिल्ली : कोरोनावरील लस १५ आॅगस्टपर्यंत तयार करण्यासाठी आयसीएमआरने चालविलेल्या प्रयत्नांमागील तथ्य आता समोर येत आहे. हैद्राबादेतील भारत बायोटेक कंपनीला लसीच्या दोन चाचण्यांनंतर लगेच म्हणजे, चार चाचण्यांपूर्वी लस लाँच करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. हे संकेत भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. कृष्णा एला यांनी दिले.
चार चाचण्यांसाठी किमान सहा महिने ते एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तत्काळ परवानगी दिली जाऊ शकते. पण, अशा प्रकरणात सरकार आणि आयसीएमआरला अडथळे येऊ शकतात. कोविक्सिनच्या मोहिमेत भारत बायोटेक आणि इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी, पुणे यांच्यासोबत आयसीएमआर स्वत: भागीदार आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी असे निर्देश दिले आहेत की, अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील.
... तर लस लवकरच
कोव्हॅॅक्सिन लवकर बाजारात आणण्यासाठी सरकार काही करु शकते काय? असा सवाल डॉ. कृष्णा एला यांना केला असता त्यांनी लवकर लस बाजारात येण्याबाबतचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे.
जर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या चांगल्या झाल्या तर पुढील निर्णय सरकारवर अवलंबून आहे. या चाचण्या यशस्वी करुन निकाल देणे हे आमचे काम आहे. म्हणजेच, हे आता स्पष्ट आहे की, पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील चाचण्यांनंतर जर सरकारने परवानगी दिली तर लस बाजारात उपलब्ध होऊ शकते.