Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:40 AM2021-08-07T08:40:56+5:302021-08-07T08:46:01+5:30
Coronavirus Vaccination India : रुग्णवाढ होत असतानाच दुसरीकडे दिलासादायक चित्र. देशात लस घेतलेल्यांची संख्या ५० कोटींवर.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात मोठ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे सर्वांत केंद्र सरकारनं मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. तसंच ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची असेल त्यांना ती खासगी रुग्णालयातही घेता येईल. सर्व राज्यांना लस पुरवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. तसंच डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण करण्याचं ध्येय असल्याचं केंद्र सरकारनं नमूद केलं होतं. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ५० कोटी नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत, यासंदर्भातील माहिती दिली.
देशामध्ये लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ होत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समोर आलं आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ३९ कोटी तर दुसरा डोस पूर्ण करणाऱ्या ११ कोटी नागरिकांचा समावेश आहे. "भारताच्या कोरोनाविषय लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या संख्येनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. सर्वांना लस मोफत लस या मोहिमेखाली आपल्या नागरिकांना लस दिली जाईल आणि यात मोठ्या प्रमाणात भर पडेल अशी आहे," असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.
India’s fight against COVID-19 receives a strong impetus. Vaccination numbers cross the 50 crore mark. We hope to build on these numbers and ensure our citizens are vaccinated under #SabkoVaccineMuftVaccine movement.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
‘जॉन्सन’चा लसीच्या मंजुरीसाठी अर्ज
अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या एका डोसच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. याआधीही सदर कंपनीने असा अर्ज केला होता. मात्र आता मान्यताप्राप्त लसींसाठी चाचण्यांची अट केंद्राने दूर केली असल्यानं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला थेट मंजुरीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आलं होते.