Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 05:19 PM2021-06-07T17:19:49+5:302021-06-07T17:20:20+5:30

PM Narendra Modi : लसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी, पंतप्रधानांचं वक्तव्य

Coronavirus Vaccine is like a protective shield in the fight against coronavirus PM narendra modi addresses nation | Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next
ठळक मुद्देलसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी, पंतप्रधानांचं वक्तव्य

"कोरोना विरोधातील लढाईत आपण अनेकांना गमावलं. दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यापूर्वी देशाच्या इतिहासात मेडिकल ऑक्सिजनची गरज कधीही पडली नाही. अनेक जणांना कामाला लावण्यात आलं. कमी वेळात आपण मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन १० टक्क्यांनी वाढवलं. जगाच्या कानाकोपऱ्यातून जसं काही आणता येईल त्याचे प्रयत्न केली. परदेशातून औषधं आणण्यावर कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. आपल्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं होतं. कोरोना विरोधातील लढाईत नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

"या लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे आहे. लसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी आहेत. आज भारतात कंपन्या नसत्या तर काय परिस्थिती उद्भवली असती. पूर्वी लसी आणण्यासाठी दशकांचा काळ लागायचा. हेपिटायटीस, पोलिओ यांसारख्या लसीसाठी दशकांचा वेळ लागायचा. जेव्हा २०१४ मध्ये आम्हाला संधी मिळाली तेव्हा लसीकरणाचं कव्हरेज ६० टक्क्यांच्या जवळ होतं. ज्या प्रकारे लसीकरण सुरू होतं त्याप्रमाणे १०० टक्के लसीकरणासाठी ४० वर्षे लागली असती. यासाठी आम्ही मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. या अंतर्गत लसीकरण केलं जाईल आणि ज्याला गरज असेल त्याला लस दिली जाईल असं ठरवलं. केवळ ७ वर्षांत कव्हरेज ६० टक्क्यांवरून ९० टक्के केलं. आम्ही लसीकरणाची व्याप्ती वाढवली," असं मोदी यावेळी म्हणाले.

"मुलांच्या संरक्षणासाठी अनेक नव्या लसींचा कार्यक्रम आणला. आम्हाला सर्वांची चिंता होती. आम्ही १०० टक्के लसीकरणाकडे जात होतो तेव्हा कोरोनानं आपल्याला घेरलं. सर्वांसमोर भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कसं वाचवेल असं वाटत होतं. परंतु तेव्हा दृष्टीकोन स्वच्छ असतो तेव्हा सगळं शक्य होतं. एका वर्षात आपण दोन लसी लाँच केल्या. भारत इतर देशांपेक्षा मागे नाही, हे आपण दाखवून दिलं," असं त्यांनी नमूद केलं.
 

Web Title: Coronavirus Vaccine is like a protective shield in the fight against coronavirus PM narendra modi addresses nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.