Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:43 AM2022-02-23T05:43:38+5:302022-02-23T05:44:12+5:30

खासगी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड लसीचा साडेसात लाखांहून अधिक साठा कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Coronavirus Vaccine Start Corona Vaccine precautionary Dosage for All age groups IMA demands covishield covaxin | Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी

Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी

googlenewsNext

मुंबई :  खासगी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड लसीचा साडेसात लाखांहून अधिक साठा कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडे सर्व वयोगटातील लाभार्थ्यांना दक्षता मात्रा मोहिमेचे लसीकरण सुरू करण्याचे सुचविले आहे, त्या माध्यमातून वाया जाणारा लस मात्रांचा साठा टाळता येईल, असेही आयएमएने नमूद केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सौरभ संजनवाला यांनी सांगितले, खासगी क्षेत्राकडे लाखो लसींचा साठा आहे, त्याचा वापर झाला नाहीतर याचा आर्थिक फटका बसेल. शिवाय, कोरोना प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणात वाया जाईल. याकरिता, शासनाला सर्व लाभार्थ्यांसाठी दक्षता मात्रा मोहीम राबविण्याचे सुचविले आहे.  

Web Title: Coronavirus Vaccine Start Corona Vaccine precautionary Dosage for All age groups IMA demands covishield covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.